Fri, Jan 18, 2019 21:15होमपेज › Marathwada › भाजप आ. ठाकूर यांच्याविरुद्ध तक्रार

भाजप आ. ठाकूर यांच्याविरुद्ध तक्रार

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 11:28PMबीड : प्रतिनिधी 

हिंदू धर्मजागृती सभेत आ. राजासिंह ठाकूर यांनी प्रक्षोभक आणि इतर धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याची तक्रार मुस्लिम समाजातील शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे मंगळवारी केली आहे. भाजप आ. राजासिंह यांनी सभेतून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्यासह सहकारी व सभेच्या आयोजकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस प्रशासनाकडून आ. ठाकूर यांच्या भाषणाची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिस अधीकार्‍यांनी दिली.

हिंदू जनजागृती समितीच्यावतीने क्र ीडा संकुलावर आ. राजासिंह ठाकूर यांची सभा बीड येथे रविवारी पार पडली. या सभेत आमदार ठाकूर यांनी आक्रमक भाषा वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मंगळवारी मोईन मास्टर, अ‍ॅड. शेख शफिक, फारूख पटेल, खुर्शिद आलम, शाहेद पटेल, शेख मतीन, शेख एजाज आदींनी एसपींकडे लेखी तक्रार केली आहे. प्रक्षोभक वक्तव्य करून अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या प्रकरणी तसेच सभेतून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍या भाजप आ. राजासिंह ठाकूर यांच्यासह त्यांचे सहकारी, सभेचे आयोजक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण सभेची व्हिडिओ रेकॉर्डिग केली आहे. त्याची पडताळणी सुरू झाली असून आ. ठाकूर यांची सर्व वक्तव्य काळजीपूर्वक तपासली जात आहे.

Tags : Marathwada,  Complaint, against, BJP, MLA, Thakur