Tue, Jul 16, 2019 01:40होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस

राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष पदासाठी चुरस

Published On: Mar 05 2018 1:43AM | Last Updated: Mar 05 2018 12:47AMहिंगोली : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष मुनीर पटेलसह दिलीप चव्हाण, बी. डी. बांगर, मनीष आखरे, संजय कावरखे यांच्या नावाची चर्चा होत असून, पंधरा दिवसांनंतर होणार्‍या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी  आतापासूनच मार्चे बांधणी सुरू झाली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणुकीचा कार्यक्रम 25 फेबु्रवारीपासून सुरू झाला आहे. बुथ कमिटी व पंचायत सर्कल कमिटीच्या निवडणुका झाल्या. तसेच तालुका व शहर कमेटीच्या निवडणुका निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. मोहम्मद खान पठाण, यांच्या देयरेखीखाली झाल्या. या निवडणुकीचा निकाल जाहीर केलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक 3 मार्च रोजी कार्यालयात जिल्हा प्रभारी जयप्रकाश दांडेगावकर, आ. रामराव वडकुते, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे राष्ट्रवादीचे संघटन सरचिटणीस बी. डी. बांगर आदींची उपस्थिती होती.

बैठकीत जिल्हाध्यक्ष निवडी संदर्भात पंधरा दिवसांनंतर प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाला. जिल्हाध्यक्षपदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्ष मुनीर पटेलसह, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, संघटन सरचिटणीस बी. डी. बांगर यांच्यासह इतर दोघांच्या नावाची चर्चा आहे. सात महिन्यांपूर्वी भाजपला जय श्रीराम करून राष्ट्रवादीत दाखल झालेले बी. डी. बांगर यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांचेही नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी आघाडीवर आहे. सर्वानुमते जिल्हाध्यक्ष पदाची  निवड होणार असली तरी जिल्हाध्यक्ष पदासाठी दिलीप चव्हाण, बी. डी. बांगर यांच्यात चुरस असल्याचे दिसून येत आहे.