Thu, Aug 22, 2019 08:55होमपेज › Marathwada › हिंदू म्हणून एकसंध व्हा : आ. राजासिंह

हिंदू म्हणून एकसंध व्हा : आ. राजासिंह

Published On: Apr 10 2018 1:15AM | Last Updated: Apr 09 2018 11:55PMबीड : प्रतिनिधी

गेल्या काही कालावधीमध्ये हिंदूंमध्ये जातींच्या नावावर फूट पाडण्यासाठी काही  संघटना कार्यरत आहेत. या संघटना धर्मपरंपरांविषयी खोटा आणि विकृत इतिहास पसरवत आहेत. अशा वेळी जातीभेद बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकसंध होऊन हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी संघटनात्मक शक्ती दाखवून द्या, धर्मांधांची संख्या नियंत्रित करण्यासाठी देशात समान नागरी कायदा होणे आवश्यक आहे. असे आवाहन हैदराबाद येथील भाग्यनगरचे भाजपचे आमदार तथा श्रीराम युवा सेनेचे संस्थापक टी. राजासिंह यांनी केले. 

बीड शहरातील श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूल (स्टेडियम) येथे  हिंदू धर्मजागृती सभेत रविवारी ते बोलत होते.  या व्यासपीठावर मनोज खाड्ये, स्वाती खाड्ये, नीलेश सांगोलकर यांची उपस्थिती होती.  आमदार टी. राजासिंह पुढे म्हणाले की, हिंदूंनी हिंदू हितालाच प्राधान्य दिले पाहिजे. त्याअनुषंगाने विचार करता भाजी-फळे-फुले, तसेच दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या वस्तू आपण हिंदूंकडून खरेदी केल्या पाहिजेत. आज दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही प्रतिष्ठित लोकांनी त्यांच्या घरात धर्मांधांना कामाला ठेवले आहे; मात्र असे करून ते घरातच ‘जिहाद’ पोसत आहेत.  बीडच्या सभेच्यानिमित्ताने काही धर्मद्वेषी संघटनांनी सभेची भीत्तीपत्रके फाडून जो धर्मद्रोह केला आहे, त्यातून त्यांनी स्वत:ची पात्रता सिद्ध केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने हिंदूंनी उपस्थिती दर्शवून या धर्मद्रोह्यांना चपराकच दिली आहे.

भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली करण्याचे अधिकार पोलिसांना संविधानाने दिलेले नाहीत.  हिंदू जनजागृती समिती ‘लव्ह जिहाद’विषयी प्रबोधन करत आहे. यामुळे अनेक हिंदू युवती परधर्मात जाण्यापासून वाचू शकतील, असे असताना पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’चे सूत्र न सांगण्याविषयी घेतलेली भूमिका ही बोटचेपी आहे. एकीकडे देशाच्या विभाजनाची भाषा करणार्‍यांच्या विरोधात पोलिस काहीच बोलत नाहीत, तर दुसरीकडे राष्ट्रकार्य करणार्‍यांवर पोलिस बंधने आणण्याचा प्रयत्न करत आहेत. भाषण स्वातंत्र्याची पायमल्ली करण्याचे अधिकार पोलिसांना संविधानाने दिलेले नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवावे, असे टी. राजासिंह यांनी सांगितले. यावेळी नीलेश सांगोलकर यांनीही मार्गदर्शन केले. सभेस बीड शहर व परिसरातील पुरुष, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags : Marathwada, together,  Hindu, MLA RajaSinh