Sat, Nov 17, 2018 21:10होमपेज › Marathwada › लातूर : थंडीने तीन महिन्यांच्या मुलीचा बळी

लातूर : थंडीने तीन महिन्यांच्या मुलीचा बळी

Published On: Jan 26 2018 7:16PM | Last Updated: Jan 26 2018 6:59PMलातूर : प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील एका ऊसतोड कामगाराच्या तीन महिन्यांच्या मुलीचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे.  आज पहाटे चार वाजता खलंग्री (ता.रेणापूर ) येथे ही घटना घडली. नयना असे या मृत मुलीचे नाव आहे.

बाळू श्रीरंग नामनोर (रा. आमटी, पुसद तालुका , जिल्हा यवतमाळ ) हे ऊसतोड कामगार आहेत. ते आपल्या कुंटुबासोबत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शुगर मिल्स या खाजगी साखर कारखान्यांसाठी ऊसतोड करीत होते. सध्या ते खलंग्री (ता.रेणापूर ) या गावात नऊ दिवसापासून ऊसतोडीचे काम करीत होते. या गावात  कड़ाक्याची थंडी आहे.  

बाळू राहत असलेली पाल उघड्यावर होती. बाळू यांच्या तीन महिन्याच्या चिमुकलीस ही  कडाकयाची थंडी असह्य झाल्याने तीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती  गंगाखेड शुगर मिलच्या  प्रशासनाला कळविण्यात आल्यानंतर त्यांनी चिमुकलीचे प्रेत ऊसतोड कामगाराच्या गावाकडे पाठवुन दिले