Thu, Mar 21, 2019 15:26होमपेज › Marathwada › सहकारमंत्र्यांच्या"त्या" वक्तव्याचा लिंगायत समाजाकडून निषेध

सहकारमंत्र्यांच्या"त्या" वक्तव्याचा लिंगायत समाजाकडून निषेध

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी

लातूर येथील ८ व्या राज्यव्यापी बसव महामेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर विद्यापीठाच्या नामकरणावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. "विद्यापीठाचे नाव बदलून, समाजाला धर्म मागून, जातीला आरक्षण घेऊन कोणाचे पोट भरत नाही." असे वक्तव्य सहकार मंत्री देशमुख यांनी केले. या वक्तव्याचा लिंगायत समाजाच्या विविध संघटनांनी जाहीर निषेध केला, तर देशमुखांनी लिंगायत समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतील असा इशारा लिंगायत समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

सहकार मंत्री यांनी केलेल्या या वक्तव्याच्या संदर्भात लातूर येथे लिंगायत समाजाच्यावतीने विविध संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी या बैठकीत देशमुखांनी लिंगायत समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटतील असा इशारा देण्यात आला आहे. 

भारतात लोकशाही असल्यामुळे स्वतंत्र धर्म मागणे तसेच सोलापूर विद्यापीठास सिध्दरामेश्वर ( सिध्देश्वर ) विद्यापीठ या नावाची मागणी करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. सोलापूर विद्यापीठ नामांतराचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना सहकार मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे योग्य आहे का?  असा प्रश्न समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. या बैठकीस लिंगायत एकीकरण समितीचे प्रमुख प्रा. संगमेश्वर पानगावे, शिवराष्ट्र सेवा संघाचे संस्थापक ॲड. निलेश करमुडी, भारतीय बसव सेनेचे संस्थापक ॲड. विश्वनाथ खोबरे, गनिमी कावा संघटनेचे रोहित चवळे, शिवा संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कोळंबे, तसेच रामलिंग बिडवे, दत्ता उस्तुरगे, प्रभाकर धमगुंडे, शिवा कोरके, विरेश कोरे, कल्लप्पा झुल्पे, राजेश शेटे, आदी उपस्थित होते.

Tags : latur, latur news, Subhash Deshmukh, statement, Solapur University, Siddharameshwar,  Lingayat community, 


  •