Wed, Apr 24, 2019 19:56होमपेज › Marathwada › माजलगाव : हरभर्‍याची खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल

माजलगाव : हरभर्‍याची खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल

Published On: May 31 2018 1:40AM | Last Updated: May 30 2018 10:42PMमाजलगाव : प्रतिनिधी

शेतकर्‍याची तूर व हरभरा हमी भावाने होत असलेल्या खरेदी केंद्रावर शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे माजलगाव बाजार समितीच्या टीएमसी आवारात 50 हजार तूर व हरभर्‍याची पोती पडून आहेत. साडेसोळा हजार क्विंटल हरभरा मापाच्या प्रतीक्षेत आसताना शासनाने खरेदी बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, या प्रश्नावर बाजार समितीचे सभापती आशोक डक सह शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

टीएमसी आवारात खरेदी केंद्रावर 21हाजार क्विंटल खरेदी पैकी 6 हजार क्विंटल तूर महिना उलटला तरी जाग्यावरच पडून आहे. त्याच बरोबर हरभरा खरेदी 29 मे पर्यंत 17 हजार 884 क्विंटल खरेदी झाला आहे.  या तूर व हरभरा खरेदीतील 23 हाजार 884 क्विंटलचे जवळपास 50 हजार पोते उघड्यावर पडून आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, सध्या शासनाने खरेदी बंद केल्याने खरेदीसाठी नोंद झालेल्या 2683 पैकी 1252 शेतकरी हरभर्‍याच्या मापापासून वंचित आहेत.

त्या पैकी 1 हाजार 97 शेतकर्‍यांची 16520 क्विंटल हरभरा केंद्रावर मापावाचून पडून आहे. खरेदी केलेला 50 हजार पोती व मापाच्या प्रतीक्षेत आसणारा 32 हजार असे जवळपास 82 हजार पोती तूर, हरभरा धान्य सध्या उघड्यावर पडून असल्याने यात फक्त शेतकर्‍यांचेच नुकसान होणार आहे.हे नुकसान टाळावे, म्हणून शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकर्‍याचे धान्य खरेदीसाठी मुदतवाढ द्यावी व शिल्लक राहिलेला मालासाठी शासकीय गोडावूनमध्ये तत्काळ जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी होत आहे.