Mon, Sep 24, 2018 07:10होमपेज › Marathwada › पळवापळवीची धास्ती : कुलूप लावून टेबलास बांधल्या खुर्च्या

पळवापळवीची धास्ती : कुलूप लावून टेबलास बांधल्या खुर्च्या

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:52AMसेनगाव : जगन्नाथ पूरी

राजकारणात सत्तेची खुर्ची आपल्याकडेच असावी यासाठी विविध पक्षांमध्ये चढाओढीचे चित्र नेहमीच पहावयास मिळते. मात्र सेनगाव पंचायत समितीमध्ये बांधकाम विभागातील अभियंत्यासमोर असणारी खुर्ची कुणी नेऊ नये म्हणून खुर्ची व टेबलला साखळदंडासह कुलूप लावल्याचा गमतीदार प्रकार पहावयास मिळत आहे.

अभियंत्याच्या खुर्चीसमोर टेबल व त्या समोर कामकाजासाठी येणार्‍या लाभार्थ्यांसाठी फायबरच्या खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र या खर्चा नेहमीच इतरत्र नेल्या जात असल्याने ऐनवेळी अभियंत्याकडे आलेल्यांना कुठे बसावे हा प्रश्‍न पडतो. नेहमीच्याच खर्ची पळापळीला थांबवण्यासाठी अखेरीस येथील कर्मचार्‍यांकांडून  त्या टेबलला बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये समितीचा कारभार सुरू झाला. तेव्हापासून विविध कारणावरून चर्चेत राहत आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, कर्मचारी निवासस्थाने हस्तांतराअभावी ओस, समिती आवारात उखडलेली फरशी, इमारत बांधकामाबाबत प्रारंभी पदाधिकार्‍यांनी उच्चस्तरीय चौकशीसाठी ठराव, विविध विभागाच्या छताचे प्लास्टर कोसळण्याच्या घटना, समिती आवारातील अस्वच्छता यामुळे चर्चेत समिती चांगलीच चर्चेत राहिली होती. त्यात आणखी भर म्हणून बांधकाम विभागातील खुच्यार्ंंना टेबलासोबत साखळदंडाने कुलूप लावण्याचा प्रकार गंमतीदार चर्चेत येवू लागला आहे.