Tue, Jul 16, 2019 22:39होमपेज › Marathwada › ऑनलाइन परीक्षा रद्द करा

ऑनलाइन परीक्षा रद्द करा

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMपरभणी : प्रतिनिधी

आयटीआय विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा रद्द करण्यासह अन्य विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात मंगळवारी (दि.15)  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी एकूण 12 मागण्यांचे निवेदन व्यवसाय शिक्षण तथा प्रशिक्षण संस्था संचालकांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आले.

आयटीआयच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा रद्द करावी. तालुका स्तरावरील मुलामुलींचे व जिल्हास्तरावरील मुलामुलींचे वसतिगृह सुरू करावे. विद्यावेतनात वाढ करावी. प्रवेश फी माफ करावी. नवीन शिक्षकांची भरती करण्यात यावी. प्रत्येक संस्थेमध्ये पाण्याची व्यवस्था करावी. मुला व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह निर्माण करण्यात यावे. प्रादेशिक भाषेत प्रश्‍नपत्रिका द्याव्यात. नवीन टे्रडस् वाढविण्यात यावेत. आधुनिक उपकरणे उपलब्ध करावेत. महावितरण- पारेषणमध्ये वायरमन टे्रडचा समावेश करावा, सर्व परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यात यावेत या प्रमुख मागण्यांसह अन्य  प्रलंबित प्रश्‍नदेखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडले.

विद्यार्थ्यांचा सहभाग : आयटीआयच्या शेकडो विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. हे आंदोलन करण्यासाठी एसएफआयचे जिल्हाध्यक्ष शेख नसीर, सचिव शेख सोहेल, सहसचिव दत्ता सोळंके, सदस्य आकाश राठोड यांनी पुढाकार घेतला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी स्टुडंट फेडरेशन इंडियाच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.