Sun, Aug 18, 2019 21:09होमपेज › Marathwada › देवेंद्र फडणवीस, उमा भारती ‘गोपीनाथ गडावर’

देवेंद्र फडणवीस, उमा भारती ‘गोपीनाथ गडावर’

Published On: Dec 06 2017 5:17PM | Last Updated: Dec 06 2017 5:17PM

बुकमार्क करा

परळी : प्रतिनिधी

गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी 12 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती गोपीनाथ गडावर येत आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने यावेळी त्यांच्या उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोपीनाथराव मुंडे यांची जयंती यंदा विविध सामाजिक उपक्रम तसेच वंचित-पीडित घटकांना मदतीचा हात देऊन साजरी होणार आहे. उपेक्षित घटकांसाठी काम करणार्‍या, तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविणार्‍या व्यक्तींचा गौरव देखील यावेळी करण्यात येणार आहे. 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता गोपीनाथ गडावर होणार्‍या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती, पालकमंत्री पंकजा मुंडे, पशूसंवधर्न व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, खा. डॉ. प्रीतम मुंडे तसेच अनेक खासदार व आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

अपंगांना साहित्य व प्रोत्साहन पर अनुदानाचे वाटप, महिला बचतगटांना व्यवसायासाठी खेळते भांडवल, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ग्रामीण लघु उद्योगांना प्रोत्साहन देणारे विविध स्टॉल्स, पदवीधर युवकांसाठी करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेंटरचा शुभारंभ आदी विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे.