Tue, Nov 13, 2018 05:58होमपेज › Marathwada › गोदामातील धान्यावर राहणार सीसीटीव्हीचा वॉच

गोदामातील धान्यावर राहणार सीसीटीव्हीचा वॉच

Published On: Aug 21 2018 1:37AM | Last Updated: Aug 21 2018 12:08AMबीड : दिनेश गुळवे

जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गोदाममधून रेशन दुकानवर धान्य दिले जाते. सदरील धान्य गोदाममध्ये सुरक्षीतरित्या ठेवले जाते. दिवसेंदिवस चोरटे हायटेक होत असताना शासकीय यंत्रणाही आता कात टाकू लागली आहे. गोदामामध्ये ठेवलेले धान्य सुरक्षीत रहावे, रात्री-अपरात्रक्ष गोदाम कोणी फोडू नये, तसेच धान्याला इतर धोका होऊ नये, यासाठी आता जिल्ह्यातील सर्व गोदावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याचा वॉच राहणार आहे. 

बीड जिल्ह्यात दोन हजार स्वस्त धान्य दुकान आहे. या धान्य दुकानमधून दर महिन्याला जवळपास सहा लाख शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ धान्य दिले जाते. कार्डधारकांना वितरीत करण्यासाठी बाहेर राज्यातून गहू व तांदूळ आणला जातो. अहमदनगर, सोलापूर आदी ठिकाणी रेल्वेने धान्य येते. तेथून ते धान्य वाहनांतून जिल्ह्यातील गोदामामध्ये आणले जाते. 

बीड जिल्ह्यात असे 22 गोदाम आहेत. या गोदामातून रेशनवर धान्य दिले जाते. शासकीय धान्य गोदाममध्ये आग लागण्यासारख्या घटना होऊ शकतात. अशावेळी आग लागली की कोणी लावली हा पहिला प्रश्‍न उपस्थित होत असतो. यासह शासकीय गोदाममधील धान्य चोरी जाण्याचा धोकाही असतो, तसेच शासकीय वितरण व्यवस्थेद्वारे नियमाप्रमाणे धान्य वितरण होते किंवा नाही, यावरही वॉच ठेवण्यासाठी आता सर्व गोदाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. 

गोदाममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासाठी संबंधित गोदाम पाल यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा हे अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात येणार आहेत. यासाठी वीज जोडणी आहे का? सीसीटीव्हींची संख्या किती लागेल, सीसीटीव्ही सुरळीत चालतील का? याची खातरजमा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून केली जात आहे. शासकीय धान्य गोदाममध्ये सीसीटीव्ही लावल्यास धान्य वितरण व्यवस्थाही अधिक पारदर्शी होणार आहे.