Thu, Jan 17, 2019 19:12होमपेज › Marathwada › 19 पोलिस ठाण्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

19 पोलिस ठाण्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : नरहरी चौधरी

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून 19 ठाण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या  ठाण्यांमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने निधी उपलब्ध केला आहे. यातून दोन टप्प्यांत ठाण्यांमध्ये हे कॅमेरे बसविले जाणार आहेत. आता ठाण्यासह परिसरावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने संवेदनशील पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात निर्देश दिले होते. त्यानुसार पोलीस आयुक्‍त बृहन्मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील 25 ठाण्यातील चार्ज रूम, लॉकअप, मार्गिका, स्टेशन हाऊस आदी पाच ठिकाणी हे कॅमेरे बसविले आहेत. यात पोलिस निरीक्षकांचे दालन, स्थानकाचा संपूर्ण परिसर व सर्व कक्षासाठी (महिला कक्ष व विश्रांती कक्ष वगळता) एकूण 140 कॅमेरे बसविण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली. यातच न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व 1100 ठाण्यात कॅमेरे बसविण्यासाठी गृहविभागाने 72 कोटी 60 लाखांच्या निधीस मंजुरी दिली.

यात परभणी जिल्ह्यातील 19 ठाण्यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव मंजूर करत तो शासनाकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव विचारात घेता उच्चस्तरीय शक्‍ती प्रदत्‍त समितीच्या 27 फेबु्रवारी रोजी झालेल्या बैठकीत ही मान्यता मिळाली. गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय हा राज्यपालांच्या आदेशाने जारी केला आहे. 

Tags : Marathwada, Marathwada News, CCTV, watch, 19 police, stations


  •