Thu, Jun 20, 2019 21:45होमपेज › Marathwada › बैलजोडी चोरणार्‍याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

बैलजोडी चोरणार्‍याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 08 2018 10:27PMगोरेगाव : प्रतिनिधी

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील पळशी टी पॉइंटवर  रविवारी (दि.8) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिस गस्तीवर होते. दरम्यान, बोलेरो जीपमध्ये एक लाख रुपये किमतीची बैलजोडी चोरून नेणार्‍या व्यक्‍तीच्या मुसक्या आवळण्यात गोरेगाव पोलिसांना यश आले.

गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत येणार्‍या पळशी टी पॉइंटवर रविवारी पहाटे साडेतीन वाजता नाकाबंदी नेहमीप्रमाणे पोलिस गस्त देत होते. दरम्यान, बोलेरो पीकअप क्र.एमएच 30 एबी 4598 मध्ये अंदाजे एक लाख रुपये किमतीची बैलजोडी घेऊन जाणारा आरोपी फेरोज खॉ रशिद खॉ रा.सेलू बाजार जि.वाशिम आढळून आला. त्यानंतर एसडीपीओ डॉ.सिध्देश्‍वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता. चौकशीअंती सदर बैलजोडी चोरीची असल्याचे निष्पन्‍न झाले. तसेच यापूर्वी आरोपीने अशाच प्रकारे दहा गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. सदर आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सदर कारवाईत गोरेगाव पोलिस ठाण्याचे सपोनि कोरंटलु, सपोउपनि कुमरेकर, पो.कॉ. इंगोले, पोना.पाटील यांच्या पथकाने केली.