Wed, Nov 21, 2018 00:03होमपेज › Marathwada › दंगल पथकाला मिळाले बुलेटप्रूफ  जॅकेट

दंगल पथकाला मिळाले बुलेटप्रूफ  जॅकेट

Published On: May 25 2018 1:10AM | Last Updated: May 24 2018 11:11PMबीड : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दंगल नियंत्रक पथकाला बुलेट प्रूफ  जॅकेटचे वितरण गुरुवारी (दि.24) करण्यात आले, तसेच बॅक सोल्डर, लेग गार्ड व हॅन्ड गार्डही देण्यात आले आहे. दिल्‍ली येथील एनएसजी कमांडो आणि क्युआरटी मुंबई यांच्याकडचे बुलेट प्रूफ  जॅकेट आहेत. त्यानंतर ग्रामीण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. 

औरंगाबाद शहरात नुकत्याच उसळलेल्या जातीय दंगलीत व हिंसाचारात काही पोलिस अधिकारी व कर्मचारी दगडफे कीत जखमी झाले होते. ही बाब गांभीर्याने घेेत अधीक्षक जी. श्रीधर यांनी जमाव हताळताना निर्माण होणार्‍या संभाव्य परिस्थितीचा विचार करून दंगा काबू पथकाला बुलेट प्रूफ  जॅकेट देण्यचा निर्णय घेतला. 

शहर वाहतूक कर्मचार्‍यांच्या पाठापाठे पोलिस दलाने दंगल नियंत्रक पथकाला बुलेट प्रूफ  जॅकेट देऊन कोणत्याही नाजूक परिस्थितला समोर जाण्यासाठी सक्षम केले आहे. दिल्‍ली येथील एनएसजी कमांडो आणि क्युआरटी मुंबई यांच्याकडचे बुलेट प्रूफ जॅकेट आहेत.