Thu, Feb 21, 2019 11:11होमपेज › Marathwada › हिंगोली: प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे निधन

हिंगोली: प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल खुराणा यांचे निधन

Published On: Mar 13 2018 1:36PM | Last Updated: Mar 13 2018 1:36PMहिंगोली: प्रतिनिधी

येथील प्रसिद्ध उद्योगपती ब्रिजलाल टेहलाराम खूराणा (वय ८४) यांचे औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवार दि. १३ रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

हिंगोली येथील प्रसिद्ध उद्योगपती व व्यावसायिक ब्रिजलाल खुराणा गेल्या दिड महिन्यापासून आजारी होते. परंतु गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघाडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल करण्यात आले होते. ब्रिजलाल यांच्या पश्चात राणा तिलकराज खुराणा, जनकराज खुराणा, ललितराज खुराणा, जगजितराज खुराणा, हंसराज खुराणा हे पाच मुले तर मुलगी मंजूबाई गुल्हाटी आहेत. नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. ब्रिजलाल यांच्यावर बुधवारी सकाळी अकरा वाजता हिंगोली येथील क्याधू तिरावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

ब्रिजलाल खुराणा यांनी खुराणा ट्रान्स्पोर्ट, खुराणा ट्रॅव्हल्स, खुराणा पेट्रोलियम, खुराणा ऑईल फॅक्टरी, खुराणा जिनींग, संत नामदेव पतसंस्था आदींसह अनेक उद्योग त्यांनी कष्टातून उभारले आहेत. त्यातून त्‍यांनी हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. यासह त्यांनी हिंगोली येथे डेंटल कॉलेज, इंजिनियरींग कॉलेज उभारून शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. भाजपचे ते वरिष्ठ नेते होते. हिंगोलीचे नांव त्यांनी आपल्या उद्योग व्यवसायातून देश पातळीवर पोहचविले आहे. सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.