Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Marathwada › शिरूर तालुक्याला बोंडअळीचे अनुदान

शिरूर तालुक्याला बोंडअळीचे अनुदान

Published On: Apr 12 2018 1:20AM | Last Updated: Apr 12 2018 12:14AMशिरूर कासार : प्रतिनिधी

बोंडअळी अनुदानापासून सुरुवातीला शिरूर तालुक्याला वगळण्यात आले होते, मात्र शासन शेतकर्‍यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून आता शिरूर तालुक्यातील शेतकर्‍यांना बोंडअळीचे अनुदान मिळणार असल्याचेे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे नारायण विठ्ठल रुख्मिणी मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात त्या बोेलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिवलिंग शिवाचार्य महाराज, स्वामी विवेकानंद शास्त्री, आमदार भीमराव धोंडे,आ. मोनिका राजळे,माजी आ. गोविंदराव केंद्रे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हर, जि. प. समाज कल्याण सभापती संतोष हांगे, मानूरच्या सरपंच चंद्रकाला वनवे, जयदत्त धस, सर्जेराव तांदळे, मयुरी खेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मानूरला पंकजा मुंडे यांचे आगमन झाल्यावर ग्रामस्थांनी त्यांची रथामधूनमिरवणूक काढली.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, बोंडअळी अनुदानातून शिरूर तालुका वगळण्यात आलेला होता. पूर्वी जी कापसाची आणेवारी लागली होती तीच ग्राह्य धरण्यात अली होती. सरकार शेतकर्‍यांच्या बाजूने असून विमा वा कोणतेही अनुदान शेतकर्‍यांना मिळालेच पाहिजे अशी भूमिका आहे. कृषी मंत्र्यांना त्या संदर्भात बोलले असून कापसाचे फेर पंचनामे करावेत अशी सूचना केली होती. त्यानुसार शिरूरच्या तहसीलदारांनी कापसाच्या बोंड अळीने झालेल्या नुकसान भरपाईसाठी 14 कोटी 50 लाख रुपयाची मागणी केली होती. ही मागणी शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे तालुका अनुदानातून वगळला आहे असे कोणीही समजू नाही असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. प्रास्ताविक रामदास बडे यांनी केले. माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी विचार मांडले.

Tags : Marathwada,  Bonddhali, subsidy, Shirur taluka