Fri, Apr 26, 2019 09:38होमपेज › Marathwada › जिल्ह्याला २५६ कोटी मंजूर

जिल्ह्याला २५६ कोटी मंजूर

Published On: May 10 2018 1:37AM | Last Updated: May 09 2018 10:58PMबीड : प्रतिनिधी

2017 मधील खरीप हंगामात कापूस पीक बहरण्यापूर्वी बोंड अळीने हल्‍ला केल्याने जिल्ह्यातील कपाशी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे नुकसान भरपाईपोटी 256 कोटी 58 लाख रुपयांची मागणी केली होती. ही मागणी सरकारने मंजूर केली असून हे अनुदान तीन टप्प्यात वितरीत केले जाणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत अनुदानाची रक्‍कम विभागीय कार्यालयाकडून बीड कार्यालयास मिळेल.  सदरील रक्‍कम शेतकर्‍यांच्या खात्यावर तालुकास्तरावरून जमा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 85 कोटी 33 लाख रुपये प्राप्‍त होतील. उर्वरीत अनुदान दोन टप्प्यांत मिळणार आहे, दरम्यान बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात यावर्षी कापूस उत्पादक बोंड अळीच्या प्रादुर्भावाने त्रस्त झाले होते.  

जिल्ह्यात कापसाची उत्पादकता तब्बल 70 टक्के होती. त्यामुळे या शेतकर्‍यांना मदत देण्याची मागणी मागच्या काळात जोर धरून होती तब्बल 3 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती, या सर्वच क्षेत्रावरील नुकसान 33% हून अधिक होती. एनडीआरएफ मधून मदत मिळण्यासाठी किमान 33 % नुकसानीचा निकष आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने नुकसानीचा अंतिम अहवाल राज्य शासनास पाठविण्यात आला होता. एनडीआरएफमधून जिरायतीसाठी हेक्टरी 6 हजार 800 तर बागायतीसाठी हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार सर्व शेतकर्‍यांना या निकषानुसार अनुदान मिळणार आहे.