होमपेज › Marathwada › बोंडअळीवरील उपायासाठी कृषी विभाग खडबडून जागा

बोंडअळीवरील उपायासाठी कृषी विभाग खडबडून जागा

Published On: Jun 07 2018 2:07AM | Last Updated: Jun 07 2018 1:00AMशिरूर ः प्रतिनिधी 

गेल्या वर्षी गुलाबी बोंडआळीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी तालुक्यातील कृषी विभागामार्फत गाव पातळीवर मार्गदर्शन असल्या बाबतची बातमी ‘बोंडअळी बाबत शेतकरी द्विधा मनस्थितीत’ या मथळ्याखाली दैनिक पुढारी मध्ये बातमी प्रसिद्ध होताच तालुक्यातील कृषी विभाग खडबडून जाग आली असून कृषी विभागाचे अधिकारी गाव पातळीच्या चावढीवर पोहचून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने कृषी सेवा केंद्रात बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे, परंतु गेल्या वर्षी गुलाबी बोंडअळीने कपाशी शेतीचा व्यवसाय धोक्यात आला होता. यामुळे या गुलाबी बोंडआळीची धास्ती शेतकर्‍यांच्या मनात घर करून आहे. बियाणे कंपनीचे एजंट जाहिरातीसाठी थेट शेतकर्‍यांच्या दारात जात आहेत. यामुळे शेतकर्‍यांच्या द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. यात शासनाने बोगस बियाणे कंपनीवर बंदी घातली आहे यात शेतकर्‍यांना बंदी घातलेल्या बियाणा बद्दल अजूनही कसलीच कल्पना नाही यामुळे शेतकरी आणखी गोंधळला आहे. याच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज असताना विभागाकडून याला खूप विलंब केला जात आहे. यासंर्दभात दैनिक पुढारीने बुधवारी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. यामुळे तालुक्यातील कृषी विभागाकडून याची तत्काळ दखल घेत गावोगाव जाऊन गुलाबी बोंडअळी बाबत मार्गदर्शन करण्याच्या कामाला वेग दिला आहे. याचा शेतकर्‍यांना नक्कीच फायदा होणार असल्याने शेतकर्‍यातून समाधान व्यक्त केले जात आहे.