Tue, Mar 19, 2019 03:12होमपेज › Marathwada › गुन्हे उघकीस आणण्यात बीड पोलिस मराठवाड्यात अव्वल

गुन्हे उघकीस आणण्यात बीड पोलिस मराठवाड्यात अव्वल

Published On: Jan 18 2018 10:18PM | Last Updated: Jan 18 2018 10:18PMबीडः प्रतिनिधी

जिल्ह्याचा क्राईम रेशो अधीक असला तरी गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिस मागे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस महासंचालकांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार,  खून, दरोडे, अत्याचार, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचा शंभर  टक्के  तपास लावून बीड जिल्हा पोलिस दलाने महाराष्ट्रात पाचवे तर  मराठवाड्यात प्रथम क्रमांक प्राप्‍त केला आहे.

पोलिस अधिक्षक गोविंदराजन श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक घनश्याम पाळवदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी केलेल्या परिश्रमांचे फलीत मिळाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. अनुभवाला सांघिक कामगिरीची जोड देत बीड जिल्हा पोलिस दलाने मराठवाड्यात कार्य कर्तृत्वाची सलामी दिली आहे.

गेवराईतील घाडगे दाम्पत्य हत्या प्रकरण राज्यभर गाजले. याचा तपास बीड पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात पूर्ण केला. यावेळी पो. नि. दिनेश आहेर हे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर येथे पो. नि. घनश्याम पाळवदे यांची नियुक्ती झाली. त्यांनी जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली. वस्ती तपासण्याबरोबरच खून, दरोडे, चोऱ्याचा तपास लावण्याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवायांवर जोर दिला. जिल्हा पोलिस दलाने एकत्रितपणे कामगिरी केल्यामुळेच राज्यात पाचवा, तर मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावण्यात ते यशस्वी झाले. 
दरम्यान, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोराडे यांच्याकडून प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासंदर्भात अधिकारी, कर्मचार्यांना पाठपुरावा केला जात होता. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला.

शरीर, मालाविरुद्धच्या गुन्ह्यात राज्यात प्रथम

एमपीडीए कारवाईतही जिल्हा अव्वल आहे. तडीपार, मोक्का, प्रतिबंधात्मक कारवायातही बीड जिल्हा पोलिस दलाची कामगिरी उत्कृष्ट आहे. शरीर, मालाविरुद्धचे 88 टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांकावर आहेत.  

गुन्ह्यांचे प्रकार      दाखल        उघड        प्रमाण (टक्के)

खून                         56         56        100

खूनाचा प्रयत्न        105       104        99

जबरी संभोग          66         66        100

दरोडा                     12        12        100

जबरी चोरी            68         56        82

जुगार               1428        1428        100

दारुबंदी           2885        2885        100


पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या जवळपास सर्व गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश मिळाले आहे. सर्व कर्मचार्‍यांच्या सहकार्याने हे ध्येय आम्ह गाठू शकलो आहोत. चोरीचा तपास लावून हस्तगत केलेला मुद्देमाल फिर्यादींना सन्मानपूर्वक सार्वजनिक कार्यक्रमातून परत केला आहे. त्यामुळे जनतेचा पोलिसांप्रती विश्वास वाढत आहे. यापुढेही  चांगले कार्य करण्यासाठी जिल्हा पोलिस दल नेहमीच तत्पर  आहे.

 जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड


गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाया केल्या जात आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवायांवरही आमचा जोर आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावणे सुरु आहे. सर्वांनी सहकार्य केले तर गुन्ह्यांची उकल झाली. 

घनश्याम पाळवदे, पोलिस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड