Sat, Feb 23, 2019 17:06होमपेज › Marathwada › परळीतील मराठा ठोक मोर्चाचे जिल्हाभरात पडसाद

परळीतील मराठा ठोक मोर्चाचे जिल्हाभरात पडसाद

Published On: Jul 19 2018 6:16PM | Last Updated: Jul 19 2018 6:16PMबीड : प्रतिनिधी 

परळी येथे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ठोक मोर्चा काढण्यात आला होता. ठोक लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही म्हणत ठिय्या मांडलेल्या आंदोलकांचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच आहे.

दरम्यान जिल्‍ह्‍यात अनेक ठिकाणी या ठोक मोर्चा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. बीड येथे शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. धारूर येथेही आंदलनाला पाठिंबा देणासाठी तहसीलच्या आवारात कार्यकर्ते धरणे आंदोल करत आहेत. वडवणी येथे रस्ता रोको करण्यात आला. परळी येथे ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांचे गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन सुरूच होते. मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात 16 टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवू ही घोषणा करूनही आंदोलन सुरूच आहे.