Tue, Jul 16, 2019 01:55होमपेज › Marathwada › मतदानाचा आनंद असला तरी अपात्रता राजकीय धक्काच

मतदानाचा आनंद असला तरी अपात्रता राजकीय धक्काच

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMबीडः प्रतिनिधी

दीड वर्षापूर्वी झालेल्या नगर पालिका निवडणुकीत बीडकरांनी काकू-नाना विकास आघाडीला मतदानरुपी आशीर्वाद दिला. त्यामुळे आघाडीचे 19 नगरसेवक निवडूनही आले, परंतु सत्तेत अर्धे वाटेकरी असतानाही अपयशाचे खापर नगराध्यक्षांवर फुटावे या हेतूने आघाडीच्या नगर सेवकांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली. हीच आक्रमकता आघाडीसाठी घातक ठरली. तक्रारींच्या अनुषंगाने निर्णय घेत नगर विकास विभागाने उपनगराध्यक्षासह दहा नगर सेवक अपात्र केले. सोमवारी होणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या नगरसेवकांना मतदानाचा अधिकार असल्याचा आनंद असला तरी हा निर्णय राजकीय धक्काच मानला जातो.

बीड नगरपालिकेतील उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह प्रभाकर पोपळे, सय्यद फारुखअली, युवराज जगताप, रमेश चव्हाण, अमर नाईकवाडे, सम्राटसिंह चव्हाण, इद्रिस हाश्मी, मोमीन अजहरोद्दीन, रणजित बनसोडे यांना राज्याच्या नगरविकास विभागाने शनिवारी अपात्र ठरवले. विशेष म्हणजे उद्या वेगळा काही निर्णय येणार असला तरी या निर्णयामुळे वरील मंडळींना काही काळासाठी निवडणूक लढविण्यासही अपात्र ठरविले आहे. 

सर्व सभापतीपदे गेली

काकू-नाना विकास आघाडीचे 19 नगरसेवक निवडणून आल्यानंतर त्यांना एमआयएम पक्षाची साथ मिळाली. त्यामुळे नगर परिषदेवर आघाडीची सत्ता स्थापन झाली, मात्र वर्षभराच्या कालावधीत आघाडीची सत्ता बाजुला सारली गेली. परिणामी आघाडीकडील सर्व सभापती पदे गेली. एमआयएमचे नगर सेवक फुटल्यामुळे आघाडीचे स्थान डळमळीत झाले. त्यामुळे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची पालिकेवर सत्ता स्थापन झाली. 

मतदानासाठी सर्व नगरसेवक पात्र 

आघाडीचे दहा नगर सेवक नगर रचना विभागाने अपात्र केले असले तर त्यांना आज, सोमवारी होणार्या लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मतदान करता येणार आहे. मतदार यादीमध्ये नावे पूर्वीच समिविष्ठ झाली आहे व अपात्रतेचा निर्णय त्यानंतर झाला असल्याने मतदानासाठी सर्व नगर सेवक पात्र ठरणार आहेत, दरम्यान मतदान करता येणार असले तरी भविष्यात काम करताना संयम बाळगणे किती गरजेचे आहे, हे या नगरसेवकांनी लक्षात घ्यायला हवे.

कामांबरोबरच अततायीपणा

शहराने आघाडीच्या पारड्यात मतदानरुपी माप टाकले आणि राजकीय डावपेचातून संदीप क्षीरसागर यांनी अर्धी सत्ताही मिळविली, मात्र सर्व पालिकेचा डोलारा जणू आपल्याच खांद्यावर असल्यावाणी आघाडीने सर्वच कामांचे श्रेय आपल्याच मिळावे असे प्रयत्न केले. त्यांनी बार्शी नाका पुलासाठी आंदोलन, शहरातील कचरा उचलून नेण्यासाठीचे आंदोलन, पाणी प्रश्न मिटविण्यासाठी पुढाकार, रस्त्यांचे काम नगर पालिकेकडून होताना आघाडीचे नगर सेवक स्वतः तेथे उभा रहातात ही बाबींमुळे शहरात त्यांचे कौतुक होई पण याच वेळी केलेला अताताईपणाचीही चर्चा होई.