Wed, Apr 24, 2019 19:52होमपेज › Marathwada › मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

Published On: Aug 09 2018 4:00PM | Last Updated: Aug 09 2018 4:00PMबीड : प्रतिनिधी 

तालुक्यातील पाटेगाव येथील एका 32 वर्षीय तरुणाने मराठा अरक्षणासाठी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि.9) रोजी रात्री उशीरा उघडकीस आली. आरक्षणप्रश्नी यापूर्वी जिल्ह्यात आत्तापर्यंत चौघांनी आपली जीवनयात्रा संपविली असून आरक्षणासाठीचा हा जिल्ह्यातील पाचवा बळी ठरला आहे. 

दिगंबर माणिक कदम (रा.पाटेगाव) असे आत्महत्या करणार्‍या तरूणाचे नाव आहे. दरम्‍यान रेणापूर पिंपळफाटा येथे लातूर ग्रामिण चे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या मात्र कुणालाही इजा झालेली नाही.

परंडा येथे मराठा आरक्षणासाठी शहरातून भव्य रॅली काढुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जागरण गोंधळाचा कार्यक्रम कारून शासन दरबारी आरक्षणाचे मागणे मांडले. तहसिलदार यांना निवेदन देऊन पुढे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू ठेवुन तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी शांततेत बंद पाळला.