Fri, Apr 26, 2019 03:23होमपेज › Marathwada › निकाल ऐकण्यासाठी जाताना अपघात, एक ठार

निकाल ऐकण्यासाठी जाताना अपघात, एक ठार

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 9:48PM

बुकमार्क करा
बीड ः प्रतिनिधी

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी बीडला निघालेल्या उमेदवारांची जीप बीड- मांजरसुंंबा रस्त्यावर उलटली. यात नेकनूरच्या विद्यमान सरपंचांचे बंधू शेख वशीद अन्वर (34) यांचा मृत्यू झाला, तर इतर सात जण जखमी आहेत. ही घटना बुधवारी सकाळी पावणेदहा वाजता घडली. भाजपचे विद्यमान सरपंच अर्शद अन्वर या सरपंचपदाच्या उमेदवार आहेत. बुधवारी सकाळी अर्शद अन्वर त्यांचे बंधू शेख वशीद व सदस्यपदाचे काही उमेदवार जीप (क्र. एमएच 44 जी 218) मधून बीडला येत होते.

प्रमिलादेवी महाविद्यालयासमोर स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने जीप शेतात 60 फूट अंतरावर जाऊन जीप उलटली. जीपखाली दबून वशीद अन्वर यांचा जागीच मृत्यू झाला. सरपंच अर्शद अन्वर, मयूर काळे, बिभीषण शिंदे, अरशमीद सय्यद, रशीद पठाण, सलमान सय्यद व गुड्डू काझी यांचा जखमींत समावेश आहे.