Sun, Jul 21, 2019 01:57होमपेज › Marathwada › आर्वीत प्रेमी तरूणाची शेंदुर फासून काढली धिंड   

आर्वीत प्रेमी तरूणाची शेंदुर फासून काढली धिंड   

Published On: May 02 2018 6:54PM | Last Updated: May 02 2018 6:53PMशिरूरकासार : युवराज सोनवणे

बीड जिल्‍ह्‍यातल्‍या आर्वी येथे प्रेम प्रकरणातील एका तरूणाची अंगाला शेंदुर आणि गुलाल फासून धिंड काढ़ल्याचा मानुसकिला काळीमा फासनारा प्रकार समोर आला आहे. सदरील तरूणाला झाडाला डांबुन मारहाणही करण्यात आली आहे.  पीडित तरूणाच्या तक्रारी वरून पोलिसांत जवळपास 60 लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्ररकरणी दोन जनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आर्वी येथील अल्पवयीन मुलीस गावातीलच तरूणाने दि २५ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पळवून नेले होते. त्या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दि २६ रोजी फिर्याद दाखल केली होती.

मुलीच्या  नातेवाईकांकडून शोध घेतला असता, हे दोघे औरंगाबादला असल्याचे समजल्याने नातेवाईकांनी औरंगाबाद येथे नक्षत्र वाडी येथील नक्षत्र पार्क येथून त्या दोघांना ताब्यात घेऊन गावाकडे आणले . पुन्हा गावाकडे येत असताना रस्‍त्‍यात मध्येच संबंधीत तरूणाला मारहाण करण्यात आली. तर मुलीस तिंतरवणी येथे सोडून मुलाला तिथून नारायणवाडी येथे मुलीच्या मामाच्या शेतात नेत रात्री दिड वाजता हात पाय बांधून लिंबाच्या फोकाने मारहाण केली, तसेच सोमवारी आर्वी येथे बाजार तळावर वेशीवर अर्धा तास उभा करून हालगी वाजवायला लावली. तसेच मुलाच्या अंगावर गुलाल व शेंदूर फासून गावातून धिंड काढली. यावेळी त्‍याला मारहाणही करण्यात आली.

सदर घटनेची माहिती पोलिसांना समजताच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसांनी घटणा स्थळावरून त्याची सुटका करून रायमोहा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले. यानंतर शिरुरकासार पोलीस ठाण्यात सदर घटणे बाबत कृष्णा उर्फ गोटू राम यादव (वय २५ वर्षे) याचे फिर्यादीवरून हिंमत फरताडे, सुरेश फरताडे, कचरू कदम, बाळू कदम, राधाकिसन भोसले, अंजना सुरेश फरताडे, पिन्नु कदम, रामा फरताडे, हरी फरताडे, यांचे सह हालगी वाजवणार व मुलीचा मामा आणि अन्य पन्नास लोकांवर कलम ३४२, ३२३,५०४,५०६,१४३, १४७,१४८,१४९ नुसार गुन्हा नोंदवला गेला आहे. 
पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिलीप सावंत, करित आहेत. याप्रकरणी  दोन आरोपींना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले