Thu, Feb 21, 2019 11:07होमपेज › Marathwada › सीसीटीव्ही कॅमेर्‍याची राहणार राष्ट्रीय महामार्गावर नजर 

सीसीटीव्ही कॅमेर्‍याची राहणार राष्ट्रीय महामार्गावर नजर 

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 18 2018 11:03PMबीड : प्रतिनिधी

 जिल्ह्यातून गेलेल्या धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड हद्दीपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात येणार्‍या-जाणार्‍यांवर पोलिसांचा वॉच राहणार आहे.  सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्पॉन्सर व पोलिस निधीतून हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून बीड जिल्ह्यातील सर्व ठाणे आयएसओ करण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे यापूर्वीच बसविले असून बीड शहरातील प्रमुख भागात कॅमेरे बसविण्यात आले आहे. पुढील टप्पा म्हणून राष्ट्रीय महामार्गावर आता कॅमेर्‍याद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला जात असून पोलिस विभाग हायटेक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.

गुन्ह्यांना बसणार आळा

राष्ट्रीय महामार्गावर लूटमार, रॉबरीच्या घटना घडतात. तसेच अपघात करून पळून जाणार्‍यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे गुन्हा करून चोरटे वाहनातून पळून जात असतील तर त्यांच्या वाहनांचा क्रमांक सहज टिपला जाऊ शकतो. त्यांचा वेळीच माग काढला जाऊ शकतो असे पोलिसांनी सांगितले.