Tue, May 21, 2019 18:18होमपेज › Marathwada › बीड : बेलखंडी पाटोदा येथे तरूणावर वाघाचा हल्‍ला 

बीड : बेलखंडी पाटोदा येथे तरूणावर वाघाचा हल्‍ला 

Published On: May 01 2018 5:05PM | Last Updated: May 01 2018 5:05PMबीड : प्रतिनिधी 

पाटोदा तालुक्यातील बेलखंडी पाटोदा येथील एका (22 वर्षीय) तरूणावर वाघाने हल्ला केला. या हल्‍ल्‍यामधून या तरूणाने कशीबशी आपली सुटका करून घेतली असून, जखमी तरूणावर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेलखंडी पाटोदा येथील तीन तरूण बाहेर गावी जात असताना जवळच असलेल्या बांगर तलावावर पाणी पिण्यासाठी थांबले. या ठिकानी तलावाच्या सभोवती असलेल्‍या झुडपात एक वाघ दबा धरून बसलेला होता. याची माहिती नसलेला मोहन यशवन्त शहाणे हा 22 वर्षाचा तरूण तलावातील पाणी पीत असताना पाठीमागूनच वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी या तीघांचीही भितीने गाळन उडाली त्‍यातुनही यशवत्‍नने या वाघाच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्यासाठी आरडाओरड सुरू केली. तर अन्य दोन तरूणांनी वाघावर दगडाचा वर्षाव सुरू केला. वाघाच्या तावडीतून मोहनने काशी बशी आपली सुटका करून घेत स्वतःचा जीव वाचवला. मोहन च्या बगलेत व दंडावर वाघाने चावा घेतल्‍याने मोहन जखमी झाला आहे. दोघा तरूणांनी केलेल्‍या दगडांच्या मार्‍यामुळे  वाघ पळून गेला. यानंतर या दोघांनी आपल्‍या मित्रास बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्‍याच्यावर उपचार सुरू आहेत.