Sat, Mar 23, 2019 18:34होमपेज › Marathwada › बदनामीचे षड्यंत्र : धनंजय मुंडे

बदनामीचे षड्यंत्र : धनंजय मुंडे

Published On: May 19 2018 1:33AM | Last Updated: May 18 2018 11:00PMबीडः प्रतिनिधी

महामार्ग आणि शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी सक्तीने घेण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला म्हणूनच मुंजा गित्ते प्रकरणावरून बदनामीचे षड्यंत्र सुरू असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मुंजा गित्ते यांची जमीन जगमित्र कारखान्यासाठी घेण्यात आली होती, त्या जमिनीचा संपूर्ण मोबदला त्यांना दिला आहे. हवे असेल तर त्यांना आणि त्या परिसरातील शेतकर्‍यांनाही त्यांची जमीन देण्याची तयारीही धनंजय मुंडे यांनी दर्शविली आहे.

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंजा गित्ते या शेतकर्‍याची जमीन धनंजय मुंडे यांनी घेतली असल्याबाबतचे एक  पत्र व्हायरल झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे म्हणाले की, जगमित्र साखर कारखान्यासाठी मुंजा गित्ते यांची जमीन घेण्यात आली होती. त्यासाठीचा मोबदलाही त्यांना देण्यात आला असून त्याचे सर्व रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध आहे, असे असतानाही मागील चार वर्षांपासून सातत्याने  मुंजा गित्ते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे काही नेते आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत . 

सरकारने मागील आठवड्यात घेतलेल्या एका भूसंपादनासंबंधीच्या निर्णयाला कडाडून विरोध केल्यामुळे पुन्हा एकदा आपली बदनामी करण्यासाठी मुंजा गित्ते यांचा वापर केला