Wed, May 22, 2019 14:28होमपेज › Marathwada › जगदाळेंचा विजय होणार : मुंडे

जगदाळेंचा विजय होणार : मुंडे

Published On: May 18 2018 1:18AM | Last Updated: May 18 2018 12:28AMबीड : प्रतिनिधी

बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचा भाजपला पाठिंबा नसल्यामुळे अशोक जगदाळे यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येेथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले की, बीड लातूर उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 1000 मतदानापैकी राष्ट्रवादीकडे जवळपास 550 मतदार आहेत. शिवसेनेचा भाजपला पाठिंबा नाही, त्यामुळे आमचा विजय पक्का आहे. 

रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या निवडणुकीकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत राकाँला काँगे्रस पक्षाची साथ मिळली आहे. एकत्रितपणे या निवडणुकीला समोर जाणार आहोत. कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला ही बाब आमच्यासाठी आजही अनाकलनीय आहे. कराड यांचे फ ोटो इतरांसोबत प्रसिद्ध झाले असले तरी कराड आजही आमच्या सोबत असल्याचेही ते म्हणाले. आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या अनुपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुंडे म्हणाले की, आ. जयदत्त  क्षीरसागर आमच्या सोबत आहेत. ते आमचे नेते असून त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवित आहोत. यावेळी ते उपस्थित नसले तरी मनाने ते आमच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. 

माजी खा. रजनी पाटील, आ. अमरसिंह पंडित, जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पापा मोदी, जि.प. सदस्य संजय दौड, माजी आ. पृथ्वीराज साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे

देशामध्ये जातीय तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन करीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीत राकाँसोबत असल्याचे माजी खा. रजनी पाटील यांनी सांगितले.