Thu, Apr 25, 2019 18:14होमपेज › Marathwada › बाजार समिती संचालकपदी गोपीनाथ घुमरे यांची नियुक्ती 

बाजार समिती संचालकपदी गोपीनाथ घुमरे यांची नियुक्ती 

Published On: Feb 12 2018 2:49AM | Last Updated: Feb 12 2018 2:35AMबीड : प्रतिनिधी  

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तज्ञ व्यक्तींची विशेष निमंत्रीत म्हणून शिवसंग्रामचे गोपिनाथ घुमरे व रामदास नाईकवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमानुसार ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीची पाच कोटींपेक्षा कमी आहे.

त्या बाजार समितीवर 2 विशेष निमंत्रितांची नियुक्ती करणे अपेक्षीत आहे. या नियमानुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्त करण्यात आलेले ?गोपिनाथ घुमरे व रामदास नाईकवाडे यांचे शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांनी अभिनंदन केले आहे. रामदास नाईकवाडे गेली दहा वर्ष घारगाव ग्रामपंचात सदस्य म्हणून काम पाहत होते. सध्या ते चौसाळा सेवा सोसायटीचे विद्यमान चेरअमन आहेत.