Mon, Feb 18, 2019 05:47होमपेज › Marathwada › बीड जिल्हा पीक विमा भरण्यात राज्यात प्रथम 

बीड जिल्हा पीक विमा भरण्यात राज्यात प्रथम 

Published On: Mar 07 2018 2:44AM | Last Updated: Mar 07 2018 2:26AMआर्वी  : प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील खालापुरी येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत येत असलेल्या अडीअडचणींवर पर्याय शोधण्यासाठी केंद्रीय पथकाकडून मंगळवारी  बैठक आयोजित केली होती. पीक विमा भरण्यासाठी बीड जिल्हा राज्यात  प्रथम क्रमांकावर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.  पीक विम्याचा आधार घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचा योग्य मोबदला दिला जातो. यामुळे शेतकरी पीक संरक्षण म्हणून प्रतिवर्षी पिकांना विम्याचे संरक्षण घेत असतात.

यामध्ये येणार्‍या तांत्रिक अडचणी शोधून ही विमा संरक्षण योजना आणखी सोपी करण्यासाठी केंद्राकडून तालुक्यात चर्चासत्राचे आयोजन करून संबंधित पथक यावर अभ्यास करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.  दिल्लीतील सांस्कृतिक मंत्रालयाचे संचालक सर्वेशकुमार आर्या, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे   संचालक जितेंद्रकुमार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, तहसीलदार बालाजी शेवाळे यांची  उपस्थिती होती. 

 महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी या योजनेचा लाभ मिळवित असल्याची माहिती केंद्रीय पथकाकडून नमूद करण्यात आली. केंद्रीय पथका कडून सर्वेशकुमार आर्या  व जितेंद्रकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व या योजनेत कुणी एखाद्या अधिकार्‍यांकडून अडथळा निर्माण केल्यास  तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना दिले. शिरूर तहसीलचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन खालापुरी ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.