होमपेज › Marathwada › ईव्हीएमच्या चमत्कारामुळे ‘ते’ राज्याचे मुख्यमंत्री : मेश्राम

ईव्हीएमच्या चमत्कारामुळे ‘ते’ राज्याचे मुख्यमंत्री : मेश्राम

Published On: May 12 2018 1:30AM | Last Updated: May 12 2018 12:03AMपाथरी : प्रतिनिधी

ज्यांची सरपंच होण्याइतकी पात्रता नाही मात्र ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिनच्या घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री झाले आहेत, असा आरोप बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी मुख्यमंत्र्याचे नाव न घेता केले.

मेश्राम म्हणाले की, ईव्हीएम प्रगत राष्ट्रांनी नाकारली आहे.एतच् मशीनला सतत विरोध होत असतानाही मात्र निवडणूक आयोग ईव्हीएम मशीन बदलायला किंवा त्यात चिठ्ठी लावायला तयार नाही. निवडणूक आयोग नेमके कोणाच्या इशार्‍यावर काम करत आहे हे कळत नाही. मेश्राम यांनी भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात सरकारवर टीका केली. मुस्लिमांच्या पर्सनल बोर्ड ऑफ लॉच्या कायद्यात होत असलेल्या हस्तक्षेपावर कडाडून टीका केली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन  गंगाधर महाराज कुरुंदकर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. आर. एस. यादव यांनी केले. याप्रसंगी नंदाताई लोखंडे, प्रा. शफी यांनी आपली मनोगत व्यक्त केले. नितीन कांबळे, डी. एस. बडवणे, आकाश गोडबोले, प्रा. एम. ए. कांबळे, सागर कदम, हर्षवर्धन नाथभजन, अर्जुन शेगर, संतोष गायकवाड, संदीप दात्रे, संतोष पारखे, बालाजी सोगे व अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या परिवर्तन यात्रेअंतर्गत निघालेल्या पाथरी शहरातील दुचाकी रॅलीस व कार्यक्रमास संभाजी ब्रिगेड, सरकार ग्रुप, भीमयोद्धा ग्रुप,  दृष्टिकोन ग्रुप, प्रतिष्ठान, समता परिषद, अखिल भारतीय कैकाडी महासंघ, अंबूज बटालियन, जमात-ए-इस्लामी हिंद, अखिल भारतीय परीट धोबी संघ,आंबेडरवादी युवा मंच या संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम गवळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. विकास कांबळे यांनी केले.