Wed, Mar 27, 2019 02:00होमपेज › Marathwada › बाजार समितीचा शेतकरी रथ अडकला झाडाझुडपांत

बाजार समितीचा शेतकरी रथ अडकला झाडाझुडपांत

Published On: Feb 10 2018 1:34AM | Last Updated: Feb 10 2018 1:34AMमाजलगाव ः प्रतिनिधी

येथील नावाजलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला अवकळा आली आहे. बाजार समितीने खरेदी केलेली लाखो रुपये खर्चून घेतलेला  शेतकरी रथ झाडाझुडपात अडकून टाकल्याचे दिसून येत आहे.

एकेकाळी मराठवाड्यात अव्वल असणारी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या विविध समस्यांनी घेरलेल्या बाजार समितीमध्ये अनेक बाबींसाठी केलेल्या लाखो रुपयांच्या केलेल्या खर्चाच्या प्रकल्प आज धूळ खात पडून आसल्याचे दिसत आहे. माजलगाव येथील मोंढ्याचे शहरातून बाजार समितीने फुलेपिंपळगाव येथील यार्डात स्थलांतर केले असता त्या वेळी या लांब पल्ल्याच्या अडतीवर जाण्यासाठी शेतकरी, हमाल, व्यापारी यांना जाण्यासाठी जवळपास 10 लाख रुपयांची एक गाडी खरेदी करण्यात आली होती. या गाडीला कृषी रथ हे नाव देण्यात आले होते. या कृषी रथामध्ये बसून शेतकरी व्यापारी हमाल या मोंढ्यात जात होते, मात्र गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून हा कृषी रथ बंद पडला असून तो सध्या बाजार समितीच्या कापूस प्राआद्योगिक प्रकल्प (टिएमसी) च्या आवारात धूळखात झाडाझुडपांत अडकून पडला आहे.

बाजार समितीच्या दोन रुग्णवाहिका 
येथील बाजार समितीला माजी उपमुख्यमंत्री स्व.सुंदरराव सोळंके यांनी एक रुग्णवाहिका दिली होती. ती गाडी पुन्हा मेन्टनेस परवडत नसल्याने माजलगाव सहकारी साखर कारखान्यास दिली व आज सिंदफना पब्लिक स्कूलमध्ये वापरात आहे   तर दुसरी अत्याधुनिक आसलेली नवीन रुग्णवाहिका आणली होती. तिचा अपघात झाल्याने दुरुस्तीसाठी पाठवली ती पुन्हा परत आलीच नाही.

बाजार समितीला मेन्टनस करणे परवडत नसल्याने पहिली गाडी साखर कारखान्यास वापस केली. दुसरी नादुरुस्त असल्याने तिचा दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने आणू शकलो नाहीत. कृषी रथ असलेली गाडी टिएमसी आवारात उभा आहे. 
-डी.बी.फुके, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव