Tue, Mar 19, 2019 11:20होमपेज › Marathwada › आ. बाबाजानी दुर्राणी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

आ. बाबाजानी दुर्राणी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: May 01 2018 12:24AMपरभणी : प्रतिनिधी 

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्रानी हे विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दि. 3 मे रोजी सकाळी 11 वाजता  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे दाखल करणार आहेत. यावेळी सर्व जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सभापती तसेच राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्र पक्षाच्या  पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

निवडणूक प्रक्रिया सुरू असून 3 मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत अनेक उमेदवार अर्ज भरण्याची शक्यता आहे.