Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Marathwada › बाबाजानींनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

बाबाजानींनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Published On: Jul 31 2018 1:34AM | Last Updated: Jul 30 2018 10:57PMपरभणी : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनी 30 जुलै रोजी मुंबई येथे विधान भवनात सभापती रामराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. जुलै महिन्यात रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी जुलै महिन्यात बिनविरोध निवडणूक पार पडली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातील एका जागेसाठी आ.बाबाजानी दुर्राणी यांना रा.काँ.चे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार यांनी दिग्गजांना डावलून उमेदवारी दिली होती. यावेळी यात बाबाजानी दुर्राणी हे बिनविरोध विजयी झाले होते. 30 जुलै रोजी मुंबई येथे विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला.

या शपथविधीसाठी  पाथरीतून कृउबासचे सभापती अनिलराव नखाते, माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी जि.प.सदस्य चक्रधरराव उगले, सुभाषराव कोल्हे, राजेश ढगे, पं.स.उपसभापती रमेश तांगडे, ओ.बी सी. सेलचे जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के, रा.कॉ.ज्येष्ठ नेते गंगाधरराव गायकवाड, रा.कॉ. तालुकाध्यक्ष एकनाथराव शिंदे, शहराध्यक्ष सुनील उन्हाळे , माजी नगराध्यक्ष तथा न.प. गटनेते जुनेदखान दुर्रानी यांच्यासह नगराध्यक्ष नितेश भोरे, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी, माजी नगराध्यक्ष एम.ए.मोईज मास्टर, पाथरी नगर परिषदेचे सर्व सभापती, सर्व नगरसेवक यावेळी प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. दुर्राणी यांचा शपथविधी झाल्यानंतर जल्लोष केला.