Tue, Apr 23, 2019 00:35होमपेज › Marathwada › भाजप सरकार गरिबांचे कैवारी : लोणीकर

भाजप सरकार गरिबांचे कैवारी : लोणीकर

Published On: Feb 09 2018 2:01AM | Last Updated: Feb 09 2018 1:53AMसेलू : प्रतिनिधी

 सरकार हे गरिबांच्या हितासाठी अविरत काम करत आहे.केंद्र शासनाच्या  व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य गोरगरीब लाभार्थ्यांना देऊन जिल्हाभरातील 1 लाख गरजू लोकांना त्याचा फायदा मिळवून देण्याच्या हेतूने आयोजित समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले  असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे .

 यावेळी माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, मुख्यकार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, उपजिल्हाधिकारी राहुल कर्डीले, तहसीलदार स्वरूप कंकाळ, राहुल लोणीकर, नगराध्यक्ष विनोद बोराडे, संजय साडेगावकर, विठ्ठलराव रब्दडे, बाजार समिती सभापती रवींद्र डासाळकर, डॉ. ऋतुराज साडेगावकर, अरविंद थोरात, संदीप मुरकुटे, पंकज निकम, गुलाबराव लाटे, अशोक खताळ आदीसह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोणीकर म्हणाले की,  सर्व सामान्य व गरजू जनतेपर्यंत याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला पाहिजे.या आग्रहास्तव केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत समाधान शिबीराचे आयोजन केलेले आहे.