Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Marathwada › कर्नाटक विजयाचा भाजपकडून जल्लोष

कर्नाटक विजयाचा भाजपकडून जल्लोष

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMपरभणी : प्रतिनिधी 

कर्नाटक राज्यात भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्याबद्दल परभणी येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय चाटे, डॉ. मीनाताई परताणी, अजय गव्हाणे, डी.एस. कदम, नगरसेवक मधुकर गव्हाणे, नारायण कच्छवे, रितेश झांबड, सादीक अली इनामदार,  बाळासाहेब जाधव, संजय रिझवाणी, राजेश देशपांडे, मोहन कुलकर्णी, देविदास सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

पूर्णा : भाजपला कर्नाटकात मिळालेल्या विजयाबद्दल फटाके फोडून व पेढे वाटून जल्‍लोष करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम, प्रदेश उपाध्यक्ष बळीराम कदम, प्रदेश उपाध्यक्ष हनुमान अग्रवाल, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विजय कराड, शहराध्यक्ष डॉ.अजय ठाकूर, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनंत बनसोडे, भारत एकलारे, नवनाथ वागमारे, अमीन, चंद्रकांत टाकळकर, अंकुश बोकारे, गोविंद ठाकूर, राम चारपले, दादाराव चापके, सुनील दुब्बेवार आदी उपस्थित होते. .

गंगाखेड : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मिळवलेल्या विजयाबद्दल गंगाखेड भाजपच्या वतीने आंबेडकर चौकात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव रबदडे, तालुकाध्यक्ष बाबूराव पवार, सभापती श्रीनिवास मुंढे, ज्येष्ठ नेते भास्करराव मुंडे, बाळासाहेब सांगळे, श्रीपाद कोद्रीकर, नगरसेवक कलीम शेख,धम्मानंद घोबाळे, राजू जाधवर, अरुण मुंडे, गोविंद रोडे, छोटू जबदे, प्रवीण काबरा, पप्पू मोठे, ज्ञानेश्वर डाके, माउली ठोंबरे, शिवाजी बोबडे, जगन्नाथ आंधळे, शिवराज गुट्टे, संजय कातकडे, राजश्रीताई जामगे, मंजुषाताई जामगे, माधुरीताई राजेंद्र आदी उपस्थित होते.