Wed, Aug 21, 2019 19:35होमपेज › Marathwada › भाजपमध्ये जाऊन चूक, भाजपचे नेते आमच्या संपर्कात : पृथ्वीराज चव्हाण

भाजपमध्ये जाऊन चूक, भाजपचे नेते आमच्या संपर्कात : पृथ्वीराज चव्हाण

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 6:58PMनंदुरबार : प्रतिनिधी

सत्ताधारी असलेल्या भाजप सरकारमधील अनेक नेते भाजपचा राज्यातील प्रभाव कमी होत असल्याने आपण भाजप मध्ये जाऊन चूक झाल्याची भावना व्यक्त करत आहेत. तर राज्यातील अनेक नेते आता पुन्हा आपापल्या पक्षाच्या वाटेवर आहेत. यातील अनेक भाजप नेते आमच्या संपर्कात आहेत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

आज देशात अल्पसंख्याक आणि दलितांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे देशात असुरक्षतेचे वातावरण आहे. यामुळेच विरोधी पक्ष म्हणून कॉग्रेस पक्षाला संविधान वाचवण्यासाठी 'संविधान बचाव' चा नारा द्यावा लागला. सरकारने दिलेल्या आश्वासना वर लोकांनी विश्वास ठेवला होता, मात्र आता लोकांच्या आशा फोल ठरल्या आहेत. यामुळेच आज देशाचे संविधान टिकतं की नाही, पुढील निवडणुका लोकशाही पद्धतीनेच होणार का, यामुळेच कॉग्रेसपक्षाने संविधान बचावचा नारा दिला आहे, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी संविधान बचाव रॅलीसंदर्भात मांडली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रामुख्याने लक्ष देण्याची गरज आहे. कारण दलाल तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी आजची परिस्थिती आहे. जर आता शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर या पुढील अनेक प्रकल्पांना शेतकरी आपली जमीन देणार नाहीत, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.