Thu, Jan 17, 2019 18:25होमपेज › Marathwada › रमेश कराड पक्षांतर्गत होणाऱ्या घुसमटीमुळे  पुन्हा स्वगृही 

रमेश कराड पक्षांतर्गत होणाऱ्या घुसमटीमुळे  पुन्हा स्वगृही 

Published On: May 02 2018 1:18PM | Last Updated: May 02 2018 1:18PMलातूर : प्रतिनिधी

पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेले रमेश कराड पुन्हा पक्षांतर्गत होणाऱ्या घुसमटीमुळे स्वगृही परतले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात राषट्रवादी काँग्रेसला मोठी बळकटी मिळणार असून, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळातील होते. त्यामुळे पंकजा मुंढे कराड यांना आपल्या भावासारखं मानायच्या. 

कराड हे गोपिनाथ मुंढे यांचे कट्टर समर्थक होते. ते एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष  विश्नवाथ कराड यांचे पुतने आहेत. त्यांनी दोनवेळा भाजपकडून लातूर ग्रामिणची विधानसभा निवडणूक लढवली होती परंतु, ते पराभूत झाले होते. लातूर जिल्हा बँकेची निवडणूकही ते नाणेफेकीत हरले होते. 

लातूर भाजपमध्ये पंकजा मुंढे व संभाजीराव पाटील असे दोन गट आहेत. मुंढे गटाचे म्हणून कराडांची वारंवार कोंडी केली जात होती. अगदी लातूर ग्रामिणच्या तालुकाध्यक्ष निवडीतही त्यांना न विचारल्याने ते कमालीचे नाराज होते. पंकजा मुंढे शिवाय त्यांची बाजू मांडणारा भाजपमध्ये दुसरा कोणी नव्हता. तथापि विधानपरिषदेची उमेदवारी आपणास मिळेल म्हणून ही कोंडी ते सहन करीत होते. पंकजा मुंढे यांच्यावर त्यांचा मोठा विश्वास होता. परंतु, ऐनवेळी सुरेश धस यांचे नाव पुढे आल्याने रमेश कराडांच्या संयमाचा बांध फुटला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप आपणाला डावलणार हेही त्यांनी ओळखले. कराडांचा संपर्क व राजकारणासाठी सर्वांगांनी असलेली त्यांची अनुकूलता हेरुन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना तंबूत घेतले. लातूर, उस्मानाबाद व बीड या स्थानिक स्वराज मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहीले आहे. काँग्रेसचे दिलीपराव देशमुख हे सलग तीनवेळा निवडून आले आहेत. यावेळी मात्र, त्यांनी निवडणूक न लढवण्याचे ठरवले असून,  नव्या चेहऱ्यांना संधी द्या अशी भूमिका त्‍यांनी घेतली आहे. मतदारसंघात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मतबळ अधिक आहे. कराडांना राषट्रवादीने उमेदवारी दिल्यास व काँगेसची साथ राहील्यास त्यांचा विजय सुकर होणार आहे.