होमपेज › Marathwada › मळणीयंत्र गळ्यावरून गेल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

मळणीयंत्र गळ्यावरून गेल्याने शेतकर्‍याचा मृत्यू

Published On: Mar 14 2018 3:58PM | Last Updated: Mar 14 2018 3:58PMऔंढा नागनाथ : प्रतिनिधी

हिंगोली जिल्‍हयातील औंढा नागनाथ तालुक्यातल्‍या राजापुर येथे एका शेतकर्‍याच्या गळ्यावरून मळणी यंत्र गेल्‍याने या शेतकऱ्याचा मृत्‍यू झाला.  अंकुशराव फकीरराव पोले (वय 50) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.अंकुशराव हे शेतातील गहू काढून इंजीनवरील मळणीयंत्र परत नेत असताना ही घटना घडली. ही घटना मंगळवार दि.13 मार्च रोजी घडली.

अंकुशराव पोलेंनी मंगळवारी १३ रोजी शेतातील गहू मळणीयंत्राद्वारे काढले. अन् मळणीयंत्र सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परत घेउन जात होते. याच दरम्यान औंढा-जलालदाभा या रस्त्यावरील सावरखेडा फाट्याजवळ उतार लागल्याने बैल भरधाव निघाले होते. यातच शेतकरी अंकुशराव यांचा तोल गेल्‍याने त्यांचे शरीर मळणीयंत्राखाली गेले. मळणीयंत्राचे चाक गळ्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ औंढ्याच्या रूग्णालयात उपचारासांठी दाखल केले असता. प्राथमिक उपचार डॉ.राहुल वाघमारे यांनी करून हिंगोलीला पाठवले होते. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्यांना शासकीय रूग्णालय नांदेडकडे नेत असतांना रस्त्यामध्येच त्यांची प्राणज्योत माळवली. राजापूर येथे शोकाकुल वातावरणात बुधवारी दि.14 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा, आई, पत्नी असा परिवार आहे. शेतकर्‍याच्या अशा दुर्देवी निधनामुळे राजापूर परिसरात शोककळा पसरली आहे.