Wed, Apr 24, 2019 07:57होमपेज › Marathwada › औंढा तालुक्यातील पावसाने रब्बीची वाताहत

औंढा तालुक्यातील पावसाने रब्बीची वाताहत

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:25AMऔंढा नागनाथ ः प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  तालुक्यातील गोळेगाव परिसरात केळीच्या बागेचे नुकसान झाले तर बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा, ज्वारी वादळी वार्‍यासह भुईसपाट झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण होते. रविवारी सकाळी जिल्हाभरात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने काढणीसाठी आलेला गहू, रब्बी ज्वारी आडवी झाली, तर हरभरा पिकाचेही मोठे नुकसान झाले. तालुक्यातील गोळेगाव शिवारात असलेल्या केळी बागांचेही वादळी वार्‍याने नुकसान झाले असून केळीचे अनेक घड उन्मळून पडल्यामुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.

रविवारी दुपारपर्यंत पाऊस सुरू होता, तर रात्री झालेल्या पावसाने धुमाकूळ घातल्याने रब्बीचे मोठे नुकसान झाले आहे.  हेक्टरी 25 हजारांची मदत द्यावी अवकाळी पावसामुळे औंढा, कळमनुरीसह जिल्ह्यातील सर्वच भागांत रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिकांचे पंचनामे न करता सरसकट हेक्टरी 25 हजारांची मदत राज्य शासनाने शेतकर्‍यांना द्यावी, अशी मागणी आ. डॉ. संतोष टारफे यांनी  केली आहे.