Wed, Mar 20, 2019 08:57होमपेज › Marathwada › सहाय्‍यक पोलिस निरीक्षकावर तलवार हल्ल्याचा प्रयत्न

सहाय्‍यक पोलिस निरीक्षकावर तलवार हल्ल्याचा प्रयत्न 

Published On: Mar 21 2018 7:36PM | Last Updated: Mar 21 2018 7:56PM कळमनुरी शहरातील मंगळवारी रात्रीची घटना चौघांविरूध्द गुन्हा दाखल

काळमनुरी : प्रतिनिधी

आपापसातील होत असलेले भांडण सोडविण्याकरिता गेलेले कळमनुरी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न पाच ते सहा जणांनी केला. ही घटना मंगळवारी दि. २० मार्चच्या रात्री दहाच्या सुमारास घडली. प्रसंगावधान राखल्याने आडे बचावले. हल्ला करणार्‍या आरोपींसह ३ जणांविरूध्द कळमनुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी येथील नवीन बसस्थानक परिसरात मंगळवारच्या रात्री दहा वाजण्‍याच्या सुमारास एका अवैध वाहतूक करणार्‍या जीप समोर काही गुंड प्रवृत्तीचे तरुण आपसात भांडण करीत होते. याबाबत पोलिसांना माहिती कळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधाकर आडे, पोलिस कॉन्स्टेबल सुर्यवंशी, पोलिस कॉन्‍स्‍टेबल पवार, पोलिस कॉन्‍स्‍टेबर थिटे, पोलिस कॉन्‍स्‍टेबल रवी बांगर आदींनी नवीन बसस्थानक परिसरात घटनास्थळी जाऊन सदरील भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गुंडप्रवृत्तीच्या तरूणांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. यावेळी आरोपी शेख जहिर शेख माजिद या तरुणाने सहाय्‍यक पोलिस निरीक्षक आडे यांच्यावर क्रुजर जीप क्र. एमएच २९ एल १३६ मधून काढलेल्या तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे हजर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी या तरुणाच्या हातातील तलवार हिसकाऊन घेतल्याने सुधाकर आडे बालंबाल बचावले.

नवीन बसस्थानक परिसरात आरोपींनी आपसात सार्वजनिक ठिकाणी मारामारी व झुंज करीत असल्याने या वेळी भांडण सोडण्याकरिता दिलेल्या पोलिसांना धक्काबुक्की व तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने आरोपी मोहम्मद जहीर मोहम्मद तकीब, शेख जावेद शेख अब्दुला, शेख आवेस शेख याहीया यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करून दहशत निर्माण केल्याने सपोनि सुधाकर आडे यांच्या तक्रारीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हिंगोली येथील डीवायएसपी राहुल मदने यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यास भेट देऊन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली.