Mon, May 27, 2019 08:50होमपेज › Marathwada › माजलगावात अखेर तूर खरेदी सुरू

माजलगावात अखेर तूर खरेदी सुरू

Published On: May 05 2018 12:50AM | Last Updated: May 04 2018 11:20PMमाजलगाव : प्रतिनिधी

राज्य शासनाने नाफेडमार्फत सुरू केलेले तूर खरेदी केंद्र दि.18 पासून  बंद केल्यामुळे माजलगाव येथील बाजार समितीच्या खरेदी केंद्रावर जवळपास एक हजार शेतकर्‍यांची तूर खरेदी अभावी जागीच पडून राहिली होती. परंतु या नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांंची तूर खरेदी करण्यात येणार असून आज गुरुवारपासून ही खरेदी सुरू झाली आहे. 

माजलगाव तालुक्यात सुरुवातीला येथील तालुका खरेदी विक्री संघाच्या मार्फत नवीन मोंढ्यात असलेल्या टिएमसी आवारात तूर खरेदी केंद्र होते मात्र अपुर्‍या यंत्रणेमुळे व खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी शासकीय गोदाम शिल्लक नसल्याचा अडथळा आला होता. म्हणून जिल्हा मार्केटिंग अधिकारी बीड यांनी हे तूर खरेदी केंद्र  कृषी उत्पन्न बाजार समितीकडे वर्ग करण्यात आले असून बाजार समितीने दि.21  मार्चपासून सुरु करण्यात आले. तेव्हा खरेदी विक्री संघाने 2140 शेतकर्‍यांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या. त्यात पुन्हा बाजार समितीने 550 शेतकर्‍यांच्या नवीन नोंदी करून तूर खरेदी सुरू केली. बाजार समितीने दि.18 एप्रिलपर्यंत एकूण 10 हाजार 36.50 एवढी तूर खरेदी केली. सध्या बंद असलेल्या तूर खरेदीमुळे खरेदी केंद्रावर आणलेल्या जवळपास 1 हजार शेतकर्‍यांचे तुरीचे माप होणे बाकी असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आज जवळपास 300 शेतकर्‍यांची तूर सध्या पडून आहे. यात या खरेदी केंद्रा मार्फत एकूण 1135 शेतकर्‍यांना एसएमएस पाठवले असल्याने ते शेतकरी तूर खरेदी केंद्रावर तूर आणू शकतात. शेतक़र्‍यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केल्याने दि. 3 पासून तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे.