Wed, Mar 27, 2019 03:56होमपेज › Marathwada › ‘अस्मिता’च्या लाभापासून हजारो किशोरवयीन मुली वंचित

‘अस्मिता’च्या लाभापासून हजारो किशोरवयीन मुली वंचित

Published On: Mar 07 2018 2:44AM | Last Updated: Mar 07 2018 2:16AMपरभणी  : प्रतिनिधी

अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील किशोरवयीन मुली पात्र आहेत, परंतु खासगी माध्यमांच्या शाळेतील 63 हजार 480 किशोरवयीन मुली या लाभापासून वंचित राहत आहेत.त्यामुळे 1 मार्चच्या परिपत्रकात सुधारणा करून खासगी शाळेतील किशोरवयीन मुलींनाही लाभ द्यावा, अशी मागणी जि.प.उपाध्यक्षा भावना नखाते यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळेतील 11 ते 19  वयोगटातील किशोरवयीन मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीबाबत ग्रामविकास मंत्रालयाय विभागाच्या वतीने 1 मार्च रोजी अस्मिता योजना जाहीर करण्यात आली आहे.

या योजनांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील मुलींना अस्मिता कार्ड व माफक दरात सॅनिटरी नॅपकिन्स दिल्या जाणार आहेत.परंतु या योजनेपासून खासगी माध्यमांतील शाळेतील किशोरवयीन मुली वंचित राहत आहेत. त्यामुळे खासगी माध्यमाच्या शाळेतील मुलींनाही या योजनेचा लाभ देण्यात यावा. याबाबत 5 मार्च रोजी जि.प.च्या उपाध्यक्षा भावना नखाते यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा यांना निवेदन दिलेे. ग्रामविकासमंत्री मुंढे यांनी 1 मार्च रोजी ग्रामीण भागातील महिला व जि.प.शाळेतील 11 ते 19 वयोगटातील मुलींना वैयक्तिक स्वच्छता व जनजागृतीबाबत अस्मिता योजनेच्या काढलेल्या परिपत्रकात बद्दल करण्यात येईल असे आश्‍वासन दिले.


खासगी व जि.प.शाळेतील किशोरवयीन मुलींची संख्या  :

सदरील परिपत्रकाच्या अनुषंगाने ग्रामीण भागासह शहरी भागात मुलींची संख्या ही खासगी माध्यमाच्या शाळेत मोठ्या प्रमाणात आहे. परभणी जिल्ह्यात 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींची संख्या ही जिल्हा परिषद शाळेत 19,594 आहे.खासगी माध्यमांच्या अनुदानित शाळेत 54,843 व विनाअनुदानित शाळेत 8,637 अशी एकूण 63,480 किशोरवयीन मुलींची संख्या आहे. 

मुलींना अस्मिता कार्ड व 8 पॅडचे एक पाकीट 5 रुपयांत मिळणार :

सदरील परिपत्रकानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हा परीषद शाळेतील किशोरवयीन मुलींना लाभ देण्याबाबत मुलींची नोंदणी प्रक्रिया जिल्हा परिषद शाळेत सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत अस्मिता कार्ड व 8 पॅडचे एक पाकीट मुलींना 5 रुपये या माफक दरात दिले जाणार आहे. 19,594 मुलींना याचा लाभ मिळेल. -भावना नखाते, उपाध्यक्षा जि.प.परभणी.