Mon, Mar 25, 2019 04:59
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › असिफा अत्याचार; गंगाखेड कडकडीत बंद

असिफा अत्याचार; गंगाखेड कडकडीत बंद

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:57PMपरभणी : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमध्ये आठ वर्षांची असिफाचे अपहरण करून तिच्यावर पाशवी अत्याचार करणार्‍यास फाशीची शिक्षा देण्याची मागणीसाठी दि.17 एप्रिल रोजी गंगाखेड शहर कडकडीत बंद ठेवत मुस्लिम समाजाच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सर्व समाजाने सहभाग घेऊन गुन्हेगारांवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली.

जम्मू-काश्मीरात आठ वर्षीय असिफा हिचे अपहरण करून तिला मंदिरात ठेवले जाते. आणि तिच्यावर सलग सात दिवस पाशवी अत्याचार करण्यात येतो.तिने आरडाओरड करू नये म्हणून गुंगीचे औषध दिले गेले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.या प्रकरणातील आरोपी, त्याचा मुलगा आणि पुतण्या मेरठहून आणखी एकाला बोलावून त्यानेही तिच्यावर अत्याचार केले.प्रकरण दाबण्यासाठी चार पोलिसांना हाताशी धरण्यात आले. 

त्यातील दोन पोलिसांनीही तिच्यावर अत्याचार करत तिला ठार केले. ती मेली की नाही  हे पाहण्यासाठी डोक्यात दगड घातला गेला. हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणार असून या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ फाशी देण्याची मागणीचे निवेदन मोर्चातील लहान मुलींनी तहसीलदार यांना दिले. मोर्चात अ‍ॅड. स.अकबर, शे.खालेरभाई, नंदकुमार पटेल, अशफाक भाई, प्रल्हाद मुरकुटे, मोसिन खाँ पठाण, स.खिजर, बाळासाहेब राखेंसह असंख्य समाजबांधव सहभागी झाले होते.

Tags : Parbhani, Asifa Atrocities, Gangakhed Close,