Sun, Mar 24, 2019 10:56होमपेज › Marathwada › दहा एकरांत बहरली 18 पिके

दहा एकरांत बहरली 18 पिके

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:20PMआर्वी : जालिंदर नन्नावरे

पारपांरिक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे, परंतु शेती परवडत नाही असे सांगणार्‍या शेतकर्‍यांना आर्वी येथील माजी सरपंच गणपत पवळ यांची आधुनिक शेती पाहिल्यानंतर विचार करायला भाग पाडणारी आहे. कारण त्यांनी नुसत्या रब्बीच्या हंगामात दहा एक्करवर तब्बल आठरा वेगवेगळी शेती उत्पादन घेतली आहेत. आर्वी गावातील शिवार तस पाहिला तर केवळ चार महिनेच बागायती म्हटले तरी वावंग ठरणार नाही. उथळा नदीला पाणी वाहत असले तरच शेतीला पाणी मिळते फेब्रुवारी मार्चमध्ये भीषण उन्हाळ्याची स्थिती निर्माण होते यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ धावपळ करीत असतात तेथे शेतीला पाणी कोठून मिळणार याचा विचार मनाशी बांधून माजी सरपंच गणपत पवळ यांनी शेतात भव्य शेत तलावाची उभारणी केली यामुळे त्यांच्या शेतीला भर उन्हाळ्यातही मुबलक पाणी उपलब्ध झाले यामुळे त्यांनी पारंपरिक पद्धतीने घेतल्या जाणार्‍या पिकाना टाळत अल्प कालावधीत भरघोस उत्पादन देणार्‍या शेती पिकांची शेती त्यांनी सध्या बहरात आणली आहे.

आज घडीला गावातील पाणी पातळी हळुहळू घटत असताना देखील दहा एक्कर क्षेत्रात त्यांनी तब्बल आठरा प्रकारची शेती उत्पादने घेतला आहेत या आधुनिक शेतीला पाहण्यासाठी तालुक्यासह जिल्हा भरातील प्रगत शेतकरी भेटी देत आहेत व या शेतीचे कौतुक करीत आहेत. शेत तलावाच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत केल्या जाणार्‍या शेतीने गणपत पवळ मोठ्या प्रमाणावर आर्थिक हातभार लागत असून सध्या ते परिसरात आधुनिक शेतीचे मार्गदर्शक देखील ठरत आहेत.