Fri, Apr 26, 2019 01:29होमपेज › Marathwada › 190 कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

190 कोटींच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी :  प्रतिनिधी

शहर महानगरपालिकेतर्फे 2018-19 चे अंदाजपत्रक 31 मार्च रोजी सकाळी बी.रघुनाथ सभागृहात महापौर मीनाताई वरपुडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत  सादर करण्यात आले. यात मनपाचे 591.10 कोटी जमा व 400.95 कोटी खर्च वजा जाता 190 कोटीच्या शिलकी अंदाजपत्रकास मंजुरी दिली.
 

 उपमहापौर सय्यद समी  ऊर्फ माजुलाला, आयुक्त राहुल रेखावार, प्रभारी नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प स्थायी समिती सभेत दाखल केला होता. सभागृहात अर्थसंकल्पाचे वाचन मुख्य लेखाधिकारी गणेश जाधव यांनी केले. सभागृहनेते भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते जलालोद्दीन काझी, एस.एम.अली पाशा, जान मोहम्मद जानू, स्थायी समिती सभापती गणेश देशमुख, सुनील देशमुख, सचिन देशमुख यांनी  बजेटमध्ये तरतूद वाढवून देण्याच्या सूचना केल्या.

अ‍ॅड.विष्णू नवले,अशोक डहाळे, नागेश सोनपसारे, इम्रान लाला, बाळासाहेब बुलबुले, मेहराज कुरेशी, लियाकत अन्सारी यांनी महापौर चषकासाठी तरतूद करण्यात यावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धा घ्याव्यात असे सुचविले. कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे सुचविले. यावर आयुक्त रेखावार यांनी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यासाठी बजेटमध्ये 10 लाखांची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले. महापौर वरपुडकर यांनी सभागृहाच्या वतीने यासाठी पाच जणांची कमिटी नेमावी असे घोषित केले. त्यास विकास लंगोटे, बाळासाहेब बुलबुले, गणेश देशमुख यांनी अनुमोदन दिले.

अर्थसंकल्पात काही बजेटमध्ये नवीन हेडसाठी तरतूद करावी. तसेच हज हाऊस व वारकरी निवासासाठी जागा निश्चित करावी असे गटनेते भगवान वाघमारे यांनी सांगितले. यावर सोनपसारे यांनी उपासक केंद्रासाठी तरतूद करावी असे सुचविले असता आयुक्तांनी नवीन हेडमध्ये तरतूद करण्यात येईल असे सांगितले. या अर्थसंकल्पात जलतरणिका दुरुस्ती व क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात बजेटात तरतूद झाली.   यात  2017-18 चे सुधारित व 2018-19 चे जमा व खर्चाचे अंदाजपत्रक सुरुवातीच्या  शिल्लकेसह सादर केले. सन 2018-19 च्या अर्थसंकल्पात 142.03 कोटीची महसुली जमा  होणार असून भांडवली जमा ही  219.40 कोटी प्राप्त होण्याचा अंदाज वर्तविला आहे. सुरुवातीची शिल्लक ही 110.83 कोटी असून एकत्रित वार्षीक जमा रक्कम 591.10 कोटींची दाखवली आहे. तसेच 2018-19 मध्ये महसूली खर्च रु.99.91 कोटीचा प्रस्तावित अंदाजासह भांडवली खर्च रु. 281.37 कोटी करण्याचे प्रस्तावीत केले आहे. भांडवली योजनांवर जमापेक्षा अधिकचा खर्च विविध योजनेच्या सुरुवातीच्या शिल्लक निधीतूून करण्याचे प्रस्तावित आहे. एकूण खर्च रु.400.95 कोटी होणार असून अंदाजपत्राची अखेरची शिल्लक रु.190.08 लक्ष इतकी आहे.      

Tags : Marathwada, Marathwada News, Approval, balance, budget,  190 crores 


  •