Wed, Aug 21, 2019 15:23होमपेज › Marathwada › 800 वर्षांची परंपरा असलेली आपेगावची पालखी 

800 वर्षांची परंपरा असलेली आपेगावची पालखी 

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 10:29PMपाटोदा : महेश बेदरे 

पसायदानातून विश्वकल्याणाचा संदेश देणार्‍या ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर माउलींचे माता - पिता विठ्ठल पंत व रुक्मिणीआई यांची आठशे वर्षांची परंपरा असलेली पालखी आपेगाव (ता. पैठण)येथून पंढरपुरकडे  निघाली आहे. या पालखीचे गुरुवारी सायंकाळी पाटोदा शहरात आगमन होणार आहे. 

संत ज्ञानेश्वर महाराजांसह त्यांचे पिता विठ्ठलपंत व माता रुक्मिणी आईच्या पादुका दर्शनाचा दुर्मिळ योग पाटोदेकरांना मिळणार आहे. या पालखी सोहळ्याचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्याशी दै. पुढारी प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, आपेगाव येथून या पंढरीच्या वारीला संत ज्ञानेश्वर माउलींचे पणजोबा त्र्यंबकपंत यांनी सुरुवात केली, म्हणून या वारीला तब्बल 861 वर्षांची परंपरा आहे. पालखी स्वागतासाठी पाटोदाकर सज्ज झाले आहेत.