Mon, Oct 21, 2019 03:18होमपेज › Marathwada › माजलगावमध्ये आणखी एक ‘ललिता’

माजलगावमध्ये आणखी एक ‘ललिता’

Published On: Jul 02 2018 1:45AM | Last Updated: Jul 01 2018 10:49PMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर

तरुण वयात आल्यानंतर शरीरात झालेल्या हार्मोन्सच्या बदलामुळे माजलगाव तालुक्यातील ललिता साळवेचे लिंग बदल राज्यभर गाजले. आता पुन्हा ललित प्रमाणेच अन्य एक प्रकरण समोर आले आहे, मात्र ही प्रौढ व्यक्‍ती नसून पाच वर्षांचे बाळ आहे. अगदी लहान वयातच ही समस्या चिमुकल्यांस उद्भवल्याने कुटुंब चिंतेत आहेत. 

माजलगाव शहरात मजुरी करणारे दीपक (नाव बदलले आहे) यांना एक मुलगा व मुलगी आहे. तिसरे अपत्य अंकिता (नाव बदलले आहे) हिचा जन्म 18 सप्टेंबर 2013 रोजी झाला. जन्मानंतर ती मुलगी असल्याचे तिचे आई-वडील मानत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी अंकिताला त्वचेचा त्रास होऊ लागलेल्याने बीड येथील डॉक्टरला दाखविले असता त्यांनी तपासण्या करण्याचा सल्‍ला दिला. संपूर्ण तपासण्यानंतर तिच्या हार्मोन्समध्ये बदल होत असल्याचे जाणवू लागले, तसेच सोनोग्राफ ीत गर्भाशयाची पिशवी नसल्याचे स्पष्ट झाले.

त्यामुळे अंकिताचे पालक चिंतातूर होते. त्यांनी ललित साळवे याची चार महिन्यांपूर्वी भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. ललितने तिच्या आई-वडिलांना मुंबईतील ससून हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्‍ला दिला. त्यानुसार अंकिताच्या तपासणीचा पहिला राऊंड झाला आहे.  तिच्यावरही लिंग बदलाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे, मात्र सदरील शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च आहे. हा खर्च पेलावरणारा नसल्याने आखणीनच पेच वाढला आहे. आता या प्रकरणात सामाजिक संघटना व कार्यकर्त्याच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

ना आधार कार्ड ना जन्म दाखला

बाळाचे सध्या 5 वर्ष असून बाळाच्या शरीरातील बदलांमुळे याला मुलगी म्हणावे की मुलगा हा पेच निर्माण झाल्याने  या बाळाचे आधारकार्ड व जन्मदाखला ही काढला नसल्याने कुटुंबीयांनी सांगितले. पुढील वर्षी शाळेत घालण्यात येणार असल्याने नेमका कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न नातेवाइकांसमोर पडला आहे.
  WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19