Tue, Jul 16, 2019 22:15होमपेज › Marathwada › अंगणवाडी कर्मचार्‍यांचे आंदोलन

अंगणवाडी कर्मचार्‍यांचे आंदोलन

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 22 2018 12:57AMबीड : प्रतिनिधी

आयटक संलग्न राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्ष रशिदखान पठाण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. 

अंगणवाडी सेविकांना लाईनलिस्टिंग ऑनलाइनची कामे करण्यासाठी स्वतः जवळील पैसे खर्च करण्यास कार्यालयाने सांगू नये, पंचवार्षिक वाढीची रक्कम कमी केली असून कपात केलेली रक्कम त्वरित महिन्याच्या मानधनात नियमित लागू करावी, अंगणवाडी केंद्राच्या कामासाठी कार्यालयाने 3 व 4 रजिस्टर त्वरित अंगणवाडी केंद्राला देण्यात यावे, असंघटित अंगणवाडी कर्मचार्‍यांना दरदिवशी साडेतीनशे रुपये रोज व प्रॉव्हिडंट फंड उपदान राशी लागू करण्याच्या केंद्र सरकारने केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करावी, अंगणवाडी केंद्राचे खासगीकरण धोरण बंद करावे, प्रलंबित इंधन बिल व टी.ए. बिलाची रक्कम त्वरित अदा करावी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनीसेविका, पर्यवेक्षिकाच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, आजाराची पगारी रजा तसेच आजाराचा खर्च व एक महिन्याची उन्हाळी सुटी लागू करावी, इतर योजनेची कामे देण्यात येऊ नयेत, दरमहा नियमित मानधन देण्यात यावे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

यावेळी आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रशीदखान पठाण, नामदेव चव्हाण, जिल्हा सचिव शोभा रानडे, सुलभा शिंदे, बेबी बेग, ताराबाई म्हस्के, मीरा पाठक, मंगल तापकीर, भाग्यश्री वनवे, कुसूम थोरवे, आशा कर्डीले, आशा माळी आदींसह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.