Thu, Jan 24, 2019 14:55होमपेज › Marathwada › अंबानींच्या घरावर मोर्चा काढणार 

अंबानींच्या घरावर मोर्चा काढणार 

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMपरभणी : प्रतिनिधी

पीकविम्याच्या मागणीसाठी परभणीत आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना आठ दिवसांच्या आत रिलायन्स इन्श्युरन्स कंपनीने न्याय न दिल्यास कंपनीचे मालक अनिल अंबानींच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी दिला.

परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 जूनपासून पीकविम्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या शेतकरी आंदोलकांना भेटण्यासाठी खा. शेट्टी रविवारी (दि.8) आले होते. यावेळी ते म्हणाले, त्यांनी कृषी आणि महसूल विभागातील अधिकार्‍यांना हाताशी धरून रिलायन्स इन्श्युरन्स कंपनीने पीकविम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा केले. पिकांचे अतोनात नुकसान झाले असतानाही परतावा देताना सोयाबीन पिकास विमा नाकारला. ही अन्यायकारक बाब सरकार समजून घेत नाही.

शेतकर्‍यांनी अत्यंत संशोधक पद्धतीने कंपनीसह शासनाच्या कृषी विभागाची झालेली चूक सरकारच्या समोर ठेवली. परंतु, सरकार लक्ष देण्यास तयार नाही. यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनास पाठिंबा देऊन सरकारला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.