Sun, Mar 24, 2019 23:06
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › अडीच वर्षांनंतर केले ४ जणांनी आत्मसर्मपण

अडीच वर्षांनंतर केले ४ जणांनी आत्मसर्मपण

Published On: Mar 15 2018 1:19AM | Last Updated: Mar 14 2018 11:16PMबीड : प्रतिनिधी 

जमिनीच्या वादातून कुक्कडगाव येथील एकाचा चौघा जणांनी निर्घृणपणे खून केला होता. गेल्या अडीच वर्षांपासून चौघे फरार होते. या  चौघाजणांनी मंगळवारी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन आत्मसमर्पण केले. 

गणेश लहू आठवले व प्रकाश दादाराव गायकवाड यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता. या वादातून अडीच वर्षांपूर्वी गणेश लहू आठवले यांचा प्रकाश दादाराव गायकवाड, सागर गायकवाड, आकाश गायकवाड, अशोक गायकवाड या चौघा जणांनी निर्घृणपणे खून केला होता. या प्रकरणी पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता, मात्र पोलिसांना अडीच वर्षांत चारही जण सापडले नाहीत. या चौघांनी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयात येऊन आत्मसर्पण कले.